आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. आता त्यांच्या या त्यांच्या टीकेला संजय राऊत यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले की, 'आज देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत धमकीची भाषा केली. मला नाही वाटत की, मुख्यमंत्री असे कुठे बोलले. मात्र फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की, सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे. ही भाषा तर भयंकर धमकीची होती. त्यांची अशी अनेक वाक्ये आहेत जी धमकी वाटू शकतात. असा टोला राऊतांनी लगावला आहे. तसेच म्हणजे सत्तेचा वापर करुन तुम्ही धमकी देऊ पहात होतात का? असा सवालही राऊतांनी विचारला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेनेचे पक्षप्रमुख देखील आहेत. जर एखाद्या तपास यंत्रणेचा दबाव टाकण्यासाठी केला जात असेल तर राज्याचे प्रमुख म्हणून टीका करणारच. केंद्रीय संस्था बेकायदेशीरपणे मागे लागेल असेल तर त्याला तशाच भाषेत उत्तर दिले जाईल. जर कुणाला हे पटत नसेल तर त्यांनी टीका करावी. विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांनी खोटेपणाचा आश्रय घेऊ नये असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते फडणवीस?
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले होते की, 'हात धुवून मागे लागू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंतच्या इतिहासात पाहिलेले नाहीत. उद्धव ठाकरेंनी केलेले वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला न शोभणारे आहे.'
एका वर्षात काय केले, पुढची दिशा काय, यावर मुख्यमंत्र्यांना सामनाच्या मुलाखतीत काहीच सांगता आले नाही.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 28, 2020
इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते, ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.