आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणी:संजय राऊत यांचे बोलणे बालिश आणि वेडसरपणाचे, तिसरी जागा आम्हीच जिंकू; आशिष शेलारांचा दावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकांना काहीच दिवस बाकी आहेत. भाजपने तीन जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून चुरस आता आणखी वाढली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पाडली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते आशिष शेलार यांनी सेनेचे संजय जिंकणार नाही. संजय राऊत यांचे बोलणे हे बालीशपणाचे वेडसरपणाचे, तिसरी जागा आम्हीच जिंकू, असा दावा त्यांनी केला.

राज्यसभेसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम पाहणारे अश्विनी वैष्णव हे मुंबईत दाखल झाले आहेत.

भाजपचे तीन उमेदवार मैदानात -
भाजपकडून माजी रेल्वे मंत्री पियूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुरवातील भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली.

काय आहे संख्याबळ?
महाविकास आघाडीकडे 169 आमदार ( शिवसेना 55 राष्ट्रवादी 54 काँग्रेस 44 इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 )
भाजपकडे 113 (भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5)

बातम्या आणखी आहेत...