आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PMC बँक घोटाळा:वर्षा राऊत चौकशीच्या एक दिवस आधीच ED कार्यालयात हजर, ईडीने 4 वेळा बजावला होता समन्स

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्षा राऊत यांना देण्यात आलेल्या कर्जाचा PMC बँकेच्या घोटाळ्याशी संबंध, ईडीचा दावा

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना PMC बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यांना चौकशीसाठी 5 जानेवारी रोजी बोलावले होते. मात्र मीडियापासून वाचण्यासाठी वर्षा राऊत एक दिवस आधीच 4 जानेवारी (सोमवार) रोजी दुपारी EDच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत.

EDने वर्षा राऊत यांना 4 वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र दरवेळी व्यक्तिगत कारण देत त्यांनी चौकशीसाठी टाळाटाळ केली होती. ईडी सूत्रांच्या माहितीनुसार वर्षा यांच्याकडून 55 लाखांच्या व्यवहारासाठी 55 प्रश्नांची लांबलचक यादी तयार केली आहे.

राऊत कुटुंबियांचे स्पष्टीकरण

वर्षा राऊत यांना देण्यात आलेल्या कर्जाचे पीएमसी घोटाळ्याशी काही संबंध असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले होते. EDच्या दाव्याला उत्तर देताना राऊत कुटुंबीयांनी सांगितले की, हे पैसे दहा वर्षांपूर्वी घेतले होते आणि या संदर्भात, आयकर विवरण देखील दाखवला आहे.

काय आहे PMC बँक घोटाळा?

पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.

बातम्या आणखी आहेत...