आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्यांच्याकडून घेतले, त्यांच्या मिठाला जागले पाहिजे. नैतिकता यालाच म्हणतात, असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत घेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल दिला. याचाच आधार घेत शिंदे सरकारने नैतिकता शिल्लक असेल, तर राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याला शिंदे गटाकडून जोरदार उत्तर देण्यात आले.
जुना संदर्भ...
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांच्या वाढदिवसाला आज उद्धव ठाकरे गेलेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना त्यांना जलसंधारण मंत्रिपद मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गडाख ठाकरेंसोबत राहिले. आता उद्धव ठाकरे यशवंतरावांच्या वाढदिवसाला गेलेत. हा सारा घटनाक्रम पाहता संजय शिरसाट यांनी टोलेबाजी केली.
आता टीका...
शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे स्वतःला तत्त्वज्ञानी समजतात. ते नैतिकतेच्या गप्पा मारतात. नैतिकतेमुळे राजीनामा दिल्याचे म्हणतात. त्यांनी यशवंतराव गडाखांच्या वाढदिवसाला जाणार असल्याचे सांगितले. यालाच नैतिकता म्हणतात. ज्यांच्याकडून घेतले, त्यांच्या मिठाला जागले पाहिजे, असे म्हणत त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.
बाळासाहेबांचे स्वप्न...
संजय शिरसाट म्हणाले की, आमचा सावंत नावाचा सहकारी बांद्र्यात कॅन्सरने मेला. तुमच्या दहा मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण होते. तुम्ही कितीदा जाऊन भेटलात. यामिनी जाधव आमदार आहेत. तुम्ही त्यांना कितीवेळा भेटायला गेला, हे सांगितले पाहिजे. माझा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावा, हे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. उद्धव किंवा आदित्य नाही. वडिलांनी पाहिलेले स्वप्न. ती जबाबदारी पार पाडली असती, तर त्याला नैतिकता म्हणतात, असे टोले त्यांनी हाणले.
सल्लागारांनी केले वाटोळे...
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, आजच्या प्रेसमध्ये त्यांना काय बोलायचे कळत नव्हते. सल्लागारांनी त्यांचे वाटोळे केले. ते त्यांना फीड करत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया द्यायच्या नसतात, ही नैतिकता आहे. त्या निकालाचे अवलोकन करायचे असते. त्यावर मार्ग काढायचा असतो. विधानसभेचे अध्यक्ष आमच्याकडे होते. नंतर राष्ट्रवादीत गेला. पुन्हा भाजपमध्ये. तुम्हाला बोलण्याचा अधिकार काय, असा सवालही त्यांनी केला.
तुमच्या लोकांचा प्रवास...
तुमच्याकडे आलेल्या लोकांचा प्रवास का सांगत नाही. भास्कर जाधव यांचा प्रवास का सांगत नाही. सचिनचा प्रवास का सांगत नाही. बाकी इतरही काही लोक आले आहेत. त्यांचाही प्रवास का सांगत नाही. परंतु आपले झाकून टेवायचे. गिरे भी तो टांग उपर...ही तुमची अवस्था आहे. तुम्ही सांगणारे कोण? पंधरा दिवसांचा वेळ द्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही भाजप-शिवसेनेचे मते घेऊन जिंकून आलात. हे पाहता आमच्यात नैतिकता आहे. तुमच्या आमदारांना राजीनामा द्यायला सांगा, असे आवाहन त्यांनी केले.
संबंधित वृत्तः
40 आमदारांचे बंड ते आजचा खंडपीठाचा निकाल, वाचा राज्यातील सत्तासंघर्षात केव्हा काय व कसे घडले
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.