आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतोष परब हल्ला प्रकरणी दिलासा नाहीच:जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला नितेश राणेंचा जामीन अर्ज, आता उच्च न्यायालयात धाव

सिंधुदुर्ग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणामुळे आमदार नितेश राणे हे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी त्यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला होता. त्यानुसार आज कोर्टाने निर्णय दिला असून जामीन नाकारला आहे.

या प्रकरणी संशयित असलेल्या नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणावर आज कोर्टाने निर्णय दिला. त्यांचा जामीन अर्ज आज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. यानंतर ते आता उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत.

काय म्हणाले नितेश राणेंचे वकील?

या विषयी बोलताना नितेश राणेंचे वकील म्हणाले की, 'नितेश राणेंचा जामीन नाकारला आहे. इथे जामीन मिळणार नाही याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही लगेचच उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. उद्या किंवा परवा सुनावणी होईल'

यापूर्वीही फेटाळला होता अर्ज

यापूर्वी देखील सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच 10 दिवसात न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टाने मंगळवारी दुपारी निर्णय सुनावण्यात आला. यामध्ये नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. तसेच भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही शिवसेनेकडून हल्ल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...