आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:सारथी संस्था आमच्या काळात स्थापन झाली, म्हणून ती खिळखिळी करण्याचा प्रकार योग्य नाही, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे - देवेंद्र फडणवीस

मराठा क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असल्याचा आरोप मराठी क्रांती मोर्चाने केला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर भाष्य केलं आहे. सारथी संस्था आमच्या काळात स्थापन झाली, म्हणून ती खिळखिळी करण्याचा प्रकार योग्य नाही असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आज पुण्यात मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असल्याचा आरोप सरकारव केला होता. ते म्हणाले होते की, मागील सरकारने आमच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या होत्या. विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करत आहोत. सारथीची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. विजय वडेट्टीवार मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही मराठा क्रांती मोर्चाने केला होता. खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनावेळी जो शब्द दिला होता,तो सरकारने पाळावा असेही मराठा क्रांती मोर्चाने म्हटले होते. 

दरम्यान, 'उद्या मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. निकाल विरोधात गेला तर 9 ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध पाळून रस्त्यावर उतरेल,' असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. यावर बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षण हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. आम्ही जेव्हा आरक्षण दिले, तेव्हा सर्व पक्षांना विश्वासात घेतले. मोठी टीम तयार करून आम्ही काम करीत होतो. राज्य सरकारने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser