आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:सरनाईक पिता-पुत्राला ईडीने बजावले समन्स, टॉप सिक्युरिटीज ग्रुपशी संबंधित गैरव्यवहार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चाैकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर होण्याचे सांगण्यात आले आहे.

ईडीने प्रताप सरनाईक यांना खासगी फर्म टॉप सिक्युरिटीज ग्रुपशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. याआधी सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांना ईडीने २४ नोव्हेंबरला पहिल्यांदा समन्स बजावले होते. ईडीने त्याच दिवशी त्यांच्या घरासह मुंबई आणि पुण्यात १० ठिकाणी छापे टाकले होते. सूत्रांनुसार ईडीला टॉप सिक्युरिटीज ग्रुप आणि सरनाईक यांच्यातील संशयास्पद व्यवहाराचे पुरावे आढळले होते. विहंग यांना चौथ्यांदा बोलावण्यात आले आहे. ईडीने २४ नोव्हेंबरला विहंग यांची पाच तास चौकशी केली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावण्यात आले होते, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. ईडीने सरनाईक यांचे निकटवर्तीय टॉप सिक्युरिटीज ग्रुपचे प्रमोटर अमित चंडोले यांना २४ नोव्हेंबरलाच अटक केली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser