आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाहेब माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांच्यासमोर मी आत्ता भावनिक झाले होते. मी त्यांना एकच विनंती केली आहे की, साहेब तुम्ही निर्णय मागे घ्या. माझ्या मतदारसंघाच्या भावना घेऊन मी साहेबांना भेटले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर केले आहे.
63 वर्षे संसदीय राजकारणात ‘अजिंक्य’ राहिलेले 83 वर्षीय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्षपदही सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच नव्या अध्यक्ष निवडीसाठी त्यांनी समितीही जाहीर केली. ‘लोक माझे सांगती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पवारांनी ही घोषणा करताच सर्वांना धक्काच बसला. महाराष्ट्रभरातून पदाधिकारी-कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला मुंबईत दाखल होत आहेत.
कायमच साहेबांच्या नेतृत्वाची गरज
नाशिकच्या आमदार सरोज अहिरे आज आपल्या 6 महिन्याच्या मुलासह मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवारांनी राहावे. नाशिक जिल्ह्यात 14 आमदार राष्ट्रवादीने दिले आहेत. साहेब महिन्यातून एकदा नाशिकला येतातच. आम्हाला केवळ निवडणुकांसाठी साहेबांची गरज नाही. तर कायमच साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे.
सामान्य माणसाची हीच इच्छा
सरोज अहिरे म्हणाल्या, निर्णय पाहिल्यावर भावनिक झाले. ते माझ्या वडिलांसारखे. त्यांच्यासमोर मी आत्ता भावनिक झाले होते. मी त्यांना एकच विनंती केली आहे की, साहेब तुम्ही निर्णय मागे घ्या. आमच्यासाठी शरद पवार हे नेहमीच भेटण्यासाठी हक्काचे ठिकाण आहे. त्यांचे अध्यक्ष राहणे खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक सामान्य माणसाची हीच इच्छा आहे की साहेबांनीच या पदावर कायम राहावे.
मतदारसंघाच्या भावना
सरोज अहिरे पुढे म्हणाल्या, माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेने मला हातातले सर्व कार्य सोडून आज याठिकाणी येण्याची विनंती केली होती. ते प्रत्येक जण याठिकाणी येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत मला सांगितले आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या भावना घेऊन आले. जनतेचे प्रेम त्यांना निर्णय बदलण्यास भाग पाडेल. राष्ट्रवादीची स्थापना शरद पवारांनी केली. त्यामुळे त्यांचाच प्रभाव आमच्यावर असेल.
संबंधित वृत्त
शरद पवार निवृत्तीवर ठाम: 5 मे रोजी ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष; निवड समितीची पहिली पसंती सुप्रिया सुळे यांना
राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांनी मनधरणी करूनही निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. केवळ दोन दिवसांची मुदत मागून त्यांनी कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काही कार्यकर्ते व ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. आता समितीची ५ मे रोजी बैठक होईल. तीत नव्या पक्षाध्यक्षांचा निर्णय होऊ शकतो. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.