आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटोलेंच्या अडचणी वाढणार?:अ‍ॅड सतीश उके यांचा ED कोठडीतील मुक्काम वाढला, वकील म्हणाले- वेळ पडली तर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टातही जाऊ!

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडी कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्यासह भाऊ प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत कोठडीत दिवस काढावे लागणार आहेत. अशी माहिती उके यांचे वकील रवी जाधव यांनी दिली आहे. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, आम्ही ईडी कोर्टात युक्तिवाद सादर केला. ईडीची कारवाई कशी चुकीची आहे हे न्यायालयाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ईडीने सतीश उके आणि प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत कोठडी दिलेली आहे. आम्ही ईडीच्या या चुकीच्या कारवाईच्या विरोधात हायकोर्टात जाणार आहोत. वेळ पडलीच तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असे रवी जाधव यांनी सांगितले आहे.

सतीश उके यांना मनी लाँड्रींग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सतीश व प्रदीप उके यांना अटक करण्यात आली आहे. आता ईडीने सहा एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. नागपुरातील उके यांच्या घरी ईडीने धाड टाकली होती, यावेळी 5 तासांच्या चौकशीनंतर उके यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर उकेंना आणि त्यांच्या भावला मुंबईत आणल्यानंतर पीएमएल कोर्टात न्यायाधीश गिरीश गुरव यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी ईडीच्या वकीलांनी उकेंना 14 दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. बनावट कागदपत्रे आणि मुख्य ठिकाणी दीड एकर जमीनीच्या खरेदी प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. राजकीय द्वेषातून ही कारवाई सुरू असल्याचा आरोप उके यांचे वकील रवी जाधव यांनी केला आहे.

उकेंच्या विरोधात पोलिसातही गुन्हा दाखल
अ‍ॅड सतीश उके काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केल्या होत्या. याप्रकरणी फडणवीस म्हणाले की उके यांच्यावर कोर्टात न्यायाधीशांचा अवमान केल्याचा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...