आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्याग्रह आंदोलन:हाथरसप्रकरणी काँग्रेसचे आज राज्यभर सत्याग्रह आंदोलन, राज्यातील काँग्रेसच्या जिल्हा मुख्यालयी होणार सत्याग्रह

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपाचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही - बाळासाहेब थोरात

उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेने मान खाली घालायला लावली असून हे प्रकरण योगी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे पद्धतीने हाताळण्यात आल्याचा आरोप काँग्रेने केला आहे. तसेच हाथरसच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रदेश काँग्रेस सोमवारी (दि. ५) राज्यभरात सत्याग्रह करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, भाजपशासीत राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह करणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी हा सत्याग्रह केला जाणार आहे. आपण स्वतः मुंबई येथे सत्याग्रहात सहभागी होणार आहोत, असे थोरात यांनी या वेळी सांगितले.

योगी आदित्यनाथांच्या अहंकारी व हुकुमशाही प्रवृत्तीने लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथरसला जाताना धक्काबुक्की करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शेवटी भानावर आलेल्या युपी सरकारने राहुल व प्रियंका यांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली.

भाजपचा माज जनता उतरवणार

पीडित कुटुंबीयांना भेटून जाताना काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या कपड्याला हात घालण्यापर्यंत मस्तवाल पुरुष पोलिस अधिकाऱ्यांची मजल गेली. महिलांबद्दल योगी आदित्यनाथ सरकारची मानसिकता किती हीन पातळीची आहे, हेच यातून दिसले. हा सत्तेचा माज असून भाजपाचा हा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असेही थोरात म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...