आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारकडून बेरोजगारांची थट्टा सुरू:केवळ राजकीय हेतूने पोरकट घोषणा; सत्यजित तांबेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश केला आहे, तसेच दहीहंडीत सहभाग नोंदवणाऱ्या गोविंदांना क्रीडा कोट्याच्या 5 टक्के आरक्षणाचा लाभही मिळेल असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.या निर्णयाला काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी विरोध केला आहे. गोविंदाना नोकरी देण्याची घोषणा म्हणजे बेरोजगारांची चेष्टाच असल्याची टीका सत्यजित तांबेंनी केली आहे.

काय म्हणाले सत्यजित तांबे?
गोविंदांना सरकारी नोकरी देण्याबद्दल काहीही आक्षेप नाही, पण मग लेझीम, ढोल-ताशे, डोंबाऱ्याचा खेळ अशा सगळ्यांच्याच विचार का नाही ? असा सवाल युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबेंनी उपस्थित केला आहे. देशात व राज्यात बेरोजगारी वाढत असताना केवळ राजकीय हेतूने अशा प्रकारच्या पोरकट घोषणा म्हणजे तमाम युवा पिढीची केलेली चेष्टाच आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये राज्य सरकारकडून भरती प्रक्रिया झाली नाहीये. 2014 ते 2019 मध्ये भरती झाली नाही, दुर्दैवाने मविआ सरकारच्या अल्पअवधीच्या सरकारमध्येही कोणतीच भरती प्रक्रिया झाली नसल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निरोध केला आहे.

Mpsc समन्वय समितीचे टविट?

समाज अधोगतीकडे नेण्याचे मूर्तिमंत उदाहरण. दहीहंडी मधील गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देऊन,सरकारची आमच्या कडून काय अपेक्षा आहे? आम्हीसुध्दा लायब्ररी सोडून भगवे झेंडे घेत दहीहंड्या फोडत फिरायचे? आज वाटत आहे राज्यातील करोडो सुजाण नागरिकांनी कोणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुर्चीवर बसविले? असा सवाल महाराष्ट्र राज्य Mpsc समन्वय समितीच्या टविटरवरुन विचारण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...