आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यम कॉम्प्युटर घोटाळा:राजू बंधूंवरील स्थगितीचे आदेश रद्द

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिक्युरिटीज अपीलेट ट्रिब्युनलने (सॅट)सत्यम कॉम्प्युटर घोटाळा प्रकरणात बी रामलिंग राजू, राम राजू आणि इतराच्या विरोधात सेबीचे आदेश रद्द केले आहेत. सेबीने राजू बंधूंवर १४ वर्षांसाठी सिक्युरिटीज मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारच्या कामावर बंदी घालण्यात आली होती. याशिवाय ७ जानेवारी २००९ पासून बेकायदेशीररीत्या मिळवलेले ८१३ कोटी रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यास सांगितले होते. २०१८ मध्ये सेबीच्या दोन आदेशांना सहा अर्जदारांनी सॅटमध्ये आव्हान दिले होते. सॅटने सेबीचा दृष्टिकोन सदोष असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...