आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह मृत्यू प्रकरण:सत्यमेव जयते! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांचे सूचक ट्विट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआय तपासाच्या प्रकरणाला महाराष्ट्र सरकार आव्हान देऊ शकत नाही : सुप्रीम कोर्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करेल असे आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिले. सीबीआय तपासाच्या प्रकरणाला महाराष्ट्र सरकार आव्हान देऊ शकत नाही. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेला एफआयआर योग्य होता, असे कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान कोर्टाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थ पवार यांचे सूचक ट्विट

दरम्यान सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआय करेल असे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानंतर पार्थ पवार यांनी दोन शब्दांचे सूचक ट्विट केले. सत्यमेव जयते असे ट्विट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...