आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Saurabh Ganguly And Jai Shah Will Be Vying For The ICC Presidency, With Current President Greg Barkley's Term Ending In November.| Marathi News

क्रिकेट:आयसीसी अध्यक्षपदासाठी सौरभ गांगुली, जय शहा यांच्यात रंगणार चुरस, सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात संपणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा आगामी आयसीसी अध्यक्षपदासाठी एकमेकांसमोर येऊ शकतात. माध्यमांनुसार, गांगुली आणि शहा दोघेही अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहेत. दोघांमध्ये या पदासाठी स्पर्धा होऊ शकते. विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपत आहे. त्यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. नियमानुसार, दर दोन वर्षांनी अध्यक्ष निवडला जातो, तो जास्तीत जास्त सहा वर्षांसाठी काम करू शकतो.

गांगुली आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहेत. आयसीसीची सूत्रे हाती घेण्यासाठी तो पसंतीचा पर्याय असू शकतो. शहा यांचा दावाही फेटाळता येणार नाही, कारण ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जर गांगुली आयसीसीची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असेल, तर तो आधी त्याच्याकडील मत्यांची चाचपणी करेल. पाकिस्तान शांतपणे बीसीसीआयच्या व्यक्तीला आयसीसी अध्यक्ष बनवण्याची परवानगी देईल, अशी आशा कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...