आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण मंत्र्यांचा दावा:महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात खोटे बोलले गेले. वारंवार असे सांगण्यात आले की, सावरकरांनी ब्रिटिश सरकारसमोर अनेक द्या याचिका दाखल केल्या. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेवरून हिंदुत्वाचे आयकॉन वीर सावरकर अंदमान तुरुंगात कैदेमध्ये असतांना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली.' असे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये सावरकरांवरील पुस्तकाच्या लोकार्पण राजनाथ सिंह बोलत होते.

विशिष्ट विचारसरणीच्या पालनकर्त्यांनी सावरकरांची मोठ्या प्रमाणात बदनामी केली. मात्र आता ही बदनामी सहन केली जाणार नाही. तुमच्यात मतभेद असू शकतात, पण त्याला निंदनीयपणे पाहणे हे योग्य नाही. तसेच त्यांचा राष्ट्रीय योगदानाची अवहेलना करण्याची कृती देखील खपवून घेतली जाणार नाही. असे राजनाथ सिंह म्हणाले. 'वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन' या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सिंह बोलत होते.

सावरकर यांच्या विरोधात समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती पसरवण्यात आली. त्यात दया याचिकेवरून अनेक जण खोटी माहिती जनतेत पसरवतात. मात्र खरं हे आहे की, सावरकरांनी तुरुंगात असतांना गांधीजींच्या म्हणण्यावरून त्यांनी दया याचिका ब्रिटीशांकडे दाखल केली होती. कारण गांधींचे असे म्हणणे होते की, सामान्यत कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली आणि महात्मा गांधींनी सावरकरजींची सुटका करावी असे आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, ज्या प्रकारे आम्ही स्वातंत्र्यासाठी आंदोलन शांततेने चालवत आहोत, तसे सावरकरही करतील.

सावरकरांनी लोकांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीची बेडी तोडण्यासाठी प्रेरित केले तसेच स्त्रियांच्या हक्कांसह इतर सामाजिक समस्यांमध्ये अस्पृश्यतेविरोधात आंदोलनेही केली. मात्र, देशाच्या सांस्कृतिक एकतेमध्ये त्यांच्या योगदानाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आले आहे. 2003 मध्ये संसदेत सावरकरांचे चित्र लावले जात होते तेव्हा बहुतेक राजकीय पक्षांनी त्यावर बहिष्कार घातला.

तर सरकार बदलल्यावर अंदमान आणि निकोबार तुरुंगात त्यांच्या नावाचा फलक काढला गेला होता. सत्य हे आहे की त्याचा हिंदुत्वावर विश्वास होता, पण तो प्रत्यक्षात वास्तववादी होता. त्यांना विश्वास होता की, संस्कृतीची एकरूपता एकतेसाठी महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...