आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाचे पडसाद:सावरकरांचे नातू रणजीत यांनी भेट घेत मानले राज ठाकरेंचे आभार; म्हणाले - मनसेने महाराष्ट्राचा आक्रोश समोर आणला

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आभार मानले. राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक झाली. त्यांनी जनतेचा आक्रोश समोर आणल्याचे सावरकर म्हणाले.

राहुल गांधी यांनी सावरकरांनी माफी मागितली, असा आरोप करत काही कागदपत्रे दाखवली होती. त्यावरून त्यांची भारत जोडो यात्रा वादात सापडलीय. खासदार संजय राऊत यांनी आम्ही या मुद्यावरून महाविकास आघाडीतून बाहेर पडू, असा इशाराही दिला आहे.

नेमके झाले काय?

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना माफीचे पत्र लिहिले होते, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पत्र माध्यमांसमोर दाखवले. हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघलाचक मोहन भागवत यांनाही दाखवा, असेही राहुल म्हणाले. राहुल म्हणाले की, पत्रात सावरकरांनी इंग्रजांना उद्देशून असे लिहिले आहे की, 'सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ'. या पत्राच्या खाली वीर सावरकर यांची स्वाक्षरीही आहे. ही स्वाक्षरी केल्यानंतर सावरकरांनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनाही अशी सही करण्यास सांगितले होते. सावरकरांनी सर्व देशासोबत तसेच तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात असलेल्या काँग्रेसशी विश्वासघात केला होता, असा आरोपही त्यांनी केला.

गांधीविरोधात आक्रोश

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग १३ ट्विट करून उत्तर दिले. असेच पत्र महात्मा गांधींनीही लिहिल्याचे त्यांनी पुराव्यासह समोर आणले. शिवाय सावरकरांच्या कार्याचा इंदिरा गांधी, नरसिंहराव, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई ते थेट शरद पवारांपर्यंत साऱ्यांनी कसा गौरव केला याची कागदपत्रे ट्विट केली. भाजप, मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक झाले. त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले.

काय म्हणाले सावरकर?

रणजीत सावरकर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात साऱ्याच राजकीय पक्षांनी आंदोलन केले. तर मनसेने राहुल गांधी यांच्या सभेत काळे झेंडे फडकावून महाराष्ट्राचा आक्रोश समोर आणला. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानले. राज ठाकरे यांना पुरावे दिल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...