आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:कोरोना’त लपून बसणारे नेते पाहिले; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरेंवर टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आपल्याकडे अनेक नेत्यांना चांगली भाषणे करता येतात. मात्र, संघर्षाची वेळ आल्यावर हेच नेते मैदानातून पळ काढतात. कोरोनाच्या काळात आपण घरात लपून बसणारे नेते पाहिले, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

चव्हाण सेंटरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ‘लेखाजोखा’ या पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन झाले त्या वेळी फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला असताना काही लोक वेगवेगळे पॅटर्न सांगून आपल्या पाठी थोपटून घेत होते. ते समाजात जात नव्हते, दु:ख समजून घेत नव्हते. त्या वेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळत नव्हती, लोक रस्त्यावर मृत्युमुखी पडत होते. अशा काळात दरेकर यांनी रस्त्यावर उतरून काम केल्याचे फडणवीस म्हणाले.

‘आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचे रक्त आहे, आम्हाला विदर्भाचे प्रेम शिकवू नये,’ या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी असे वक्तव्य करणे हेच आमचे यश आहे. पण केवळ विदर्भाचे रक्त असून चालत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यावर होणारा अन्याय आधी थांबवला पाहिजे. मग विदर्भाच्या रक्तावर बोला, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

बातम्या आणखी आहेत...