आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा अंधारेंची घणाघाती टीका:सावंत, सत्तार, गोगावले, शिरसाट अशा चिल्लर कंपनीला मी त्यांच्या मतदार संघात जाऊन निपटेल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नऊ महिने नऊ दिवस जिच्या पोटात मी वाढले त्या आईचे स्मरण यासाठी मी करते की, आई आणि वडीलांना विसरणारे गद्दार औलाद येथे तयार झाली आहे. म्हणून हे स्मरण माझ्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. आम्ही हिंदुत्वासाठी शिवसेनेतून गेलो असे ते सांगतात, खरेच हिंदुत्व यांना जपायचे होते? तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, संजय शिरसाट असतील हे सर्व चिल्लर कंपनी मी त्यांच्या मतदार संघात जाऊन निपटेल असा घणाघात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे बोलत होत्या.

तुमचेच चित पट कसे?

अंधारे म्हणाल्या, मी आज पहिल्यांदा राजकीय कारकिर्दीतील पहिले भाषण करतेय. पण विरोधकांना पोटशूळ उठले. तुमचेच चित आणि तुमचेच पट कसे, एकीकडे हिंदुत्व शिवसेनेने सोडले म्हणतात, आणि दुसरीकडे सुषमा अंधारे शिवसेनेत कशा अशी दुटप्पी भुमिका शिंदे गटाची आहे.

निनांद्याला बारा बुद्ध्या

अंधारे म्हणाल्या, मराठवाड्यात एक म्हण आहे, निनांद्याला बारा बुद्ध्या असतात. तशा बारा कारणे शिंदे गटाने सांगितली. त्यातील मी दोनच कारणे मी सांगणार आहेत. पहिले कारण म्हणजे आम्ही हिंदुत्वासाठी शिवसेनेतून गेलो. खरेच हिंदुत्व यांना जपायचे होते? तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, संजय शिरसाट असतील हे सर्व चिल्लर कंपनी मी त्यांच्या मतदार संघात जाऊन निपटेल.

पावसकरांवर टीका

अंधारे म्हणाल्या, किरण पावसकर शिवसेनेत होता, अजित पवारांनी विधान परिषदेचे चाॅकलेट गेल्यानंतर राष्ट्रवादीत गेला नंतर मिंधे गटात गेलात. सहा वर्षे पावसकरांचे हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगले होते.

नारायण राणेंचा घेतला समाचार

नारायण राणे तुमच्या दोन बाजार बुनग्यावर मला बोलायचेच नाही, पण नारायण राव तुम्ही शहाणे सुरते आहात. नारायण राणेंनी म्हणायचे की, सोनियांचे विचार ऐकायचा का असे तुम्ही म्हणता पण त्याच सोनियांच्या पायावर लोळण घेत आपण मंत्रिपद मिळवले, पदे उपभोगली.

रामदास शिंदेंवर टीकास्त्र

अंधारे म्हणाल्या, रामदास कदमांचे हिंदुत्व शिवसेनेला ब्लॅकमेल करणारे आहे, त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याची तयारी चालवली होती. आम्ही बगलात रेडीओ ठेवतो की, धोतरात ईन करतो? का कानात बिडी आहे आमच्या? आम्ही हिंदुत्वासाठी गेलो असे सांगता, उद्धव ठाकरेंनी धर्मबदल केला का? नव्हेच.

फडणवीसांनी खरे सांगावे

अंधारे म्हणाल्या, मायबापाच्या इमानदारीने मिंधे गटाच्या म्होरक्याने आणि सूत्रधार फडणवीसांनी छातीवर हात ठेवावा , देवाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावा की, असे कोणते श्रृती, ग्रंथ, पुराण आहे की, हिंदु धर्माचे होण्यासाठी इतर धर्माचा द्वेष करावा असे सांगितले आहे. हिंदु धर्म म्हणजे सर्व धर्मांना समावून घेणारा आहे, सर्व धर्मांसोबत चालणारा आहे.

शिंदे गटाने हिंदुत्वाला कलंक लावला

अंधारे म्हणाल्या, हिंदुत्वाला शिंदे गटाने कलंक लावला. हिंदु व्यक्ती संकटात असताना एकमेकांना साथ देतात. तुमच्यासारखे पळून जात नाही. तुमचे दुखणे हे की, मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड, पुरोगामी संघटना, अठरापगड जाती आणि मुस्लिम समाजही ठाकरेंसोबत येत असल्याने पायाखालची वाळू सरकली आहे.

अंधारे म्हणाल्या, प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदेंना चॅलेंज आहे की, भाजप खरी हिंदुत्वाचे समर्थक आहेत ना या दोघांच्या जागा भाजपला द्या. अर्जून खोतकरांची जागाही अंबादास दानवेंना द्या आणि त्याग करा, खरेच शिवसेना वाचवण्यासाठी मिंधे गट जात असतील तर भाजपचे जे. पी. नड्डा शिवसेना संपवण्याची भाषा करीत असतील तर तुम्ही कुठे होता?

विजयादशमीनिमित्त उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन गटांचे पहिल्यांदाच बुधवारी स्वतंत्र मेळावे मुंबईत घेण्यात आले आहेत. बंडानंतर हे दोन्ही गट संपूर्ण ताकदीने शक्तिप्रदर्शन करत आहेत. ठाकरे गटाचा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर, तर शिंदे गटाचा वांद्रे येथील बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर आहे.

या मेळाव्यात

बातम्या आणखी आहेत...