आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंचे ट्विट, उखाड दिया?:सुनील राऊत म्हणाले होते क्या उखाड लोगे, ईडीच्या कारवाईनंतर राणे म्हणतात उखाड दिया

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते नितेश राणे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. संजय राऊतांवरील काल झालेल्या कारवाईवर नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी आमदार सुनील राऊत यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत उखाड दिया असे कॅप्शन देत, शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे राज्यात ईडी भाजपच्या सांगण्यावर कारवाई करते का असा प्रश्न महाविकास आघाडीतील नेत्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर काल ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. राऊतांच्या मालकीची जवळपास 11 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यावर काल अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र या सर्वांमध्ये नितेश राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीच, सोबतच एक ट्विट केले आहे. यात संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्या एका भाषणाची क्लिप ट्विट केली आहे. यात सुनील राऊत हे भाजप विरोधात बोलताना दिसून येत आहे. तर यासोबतच आम्ही माणसे कमावली आहेत. पैसा नाही असे सांगताना क्या उखाडेंगे असे बोल असल्याचा व्हिडिओवर राणेंनी उखाड दिया? असे एकप्रकारे प्रत्युत्तरच दिले आहे.

राजकीय सुडबुद्धीने सुरू आहे? -मविआ
भाजपकडून ईडीचा वापर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. कालच ईडी कारवाई करणार हे मला आधीच माहिती होते, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. आणि या दाव्यानंतर राणे यांनी केलेले हे ट्विट यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की, भाजपच्या सांगण्यावरच की काय ईडी कारवाई करते आहे का? राज्यात संजय राऊत आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर होणारी कारवाई राजकीय सुडबुद्धीने सुरू आहे का असा प्रश्न शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांना पडला आहे.

बातम्या आणखी आहेत...