आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • SC On Mumbai Marathi Board: If There Are No Marathi Boards On The Shops In Mumbai, No Action Should Be Taken Against The Traders For Now

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश:मुंबईतल्या दुकानांवर मराठी पाटी नसल्यास व्यापाऱ्यांवर तूर्तास कारवाई करू नये

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत मराठी भाषेत पाट्या नसलेल्या दुकानांच्या दुकानदारांवर तूर्तास कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. फेडरेशन ऑफ ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबईतील दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. ऐन मुंबई महापालिकेच्या तोंडावर हा निर्णय आला आहे.

आतापर्यंत चार मुदतवाढ

मुंबईतल्या दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत चौथी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अनेक दुकानांनी याचे पालन केले नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या वतीने कारवाई इशारा देण्यात आला होता. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

काय होती कारवाई?

मुंबईतल्या दुकानांवर मराठीत पाट्या नसल्यास सर्वप्रथम सात दिवसांची नोटीस दिली जाणार होती. त्यानंतरही मराठी पाटी नाही लावल्यास दुकाने व आस्थापनांच्या मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमातील तरतुदीनुसार दुकानांदारांवर कारवाई केली जाणार होती. त्याअंतर्गत प्रति कामगार दोन हजार रुपये दंड वसूल करत न्यायालयीन खटला दाखल करण्यात येणार होता.

निर्णयाला दिली स्थगिती

फेडरेशन ऑफ ट्रेडर्स वेल्फेअरचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मुंबईत दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यास न्यायमूर्ती के. एम. जोसेफ, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांनी स्थगिती दिली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायण, मोहिनी प्रिया यांनी न्यायालयात व्यापाऱ्यांची बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यानुसार तूर्तास तरी याप्रकरणी धडक कारवाई करता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...