आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • School Start 15 June | Corona's Illness Is Worrying But Let's Continue School With Care; Information Of Education Minister Varsha Gaikwad

कोरोनाची चिंता...पण घंटा वाजणार:शिक्षणमंत्री म्हणाल्या -शाळांसाठी जारी होणार नवी नियमावली, 13 तारखेपासून शाळा सुरू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाने राज्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. मात्र, काळजी घेऊन शाळा सुरुच राहणार, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 13 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभाग शाळांकरीता नवी कोरोना नियमावली जारी करेल, असेही शिक्षणमंत्री म्हणाल्या. त्या आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

पुढे शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या की, शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसात घेऊ. मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरवर्षी शाळा या 13 जूनपासून सुरू होतात. शाळांमध्ये पूर्णपणे काळजी घेण्यात येईल, असे गायकवाड म्हणाल्या.

काळजी घेतली जाईल

दोन वर्षांचा अनुभव पाहता कोरोना काळात मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जी मुले आता इयत्ता दुसरीत आहे ती शाळेत गेलीच नाही, त्यामुळे कुठेतरी यासंदर्भात आपल्याला यावर निर्णय घ्यावा लागेल, मुलांच्या शैक्षणिक गोष्टींचा विचार करावा लागेल त्यासाठी येणाऱ्या काळात काळजी घेतली जाईल मात्र, शाळा व्यवस्थितपणे सुरू केली जाईल, असे स्पष्टीकरण देखील गायकवाड यांनी दिले.

मास्क बंधनकारक नाही

शाळांबाबत एक नियमावली आम्ही जारी करणार आहोत, त्यात राज्याचा आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांचे मत जाणून घेतले जाईल. मात्र राज्यात सध्या तरी मास्क बंधनकारक नाही, मात्र स्वत:च्या सुरक्षेसाठी आपण मास्क वापरावा, त्याचा फायदा अनेक जणांना होऊ शकतो. सध्या तरी शाळेत मास्क बंधनकारक नसल्याचे गायकवाड म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...