आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचा भाजपला इशारा:'होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचे नाही'

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शिवसेना गुंडगिरी करते, याला सत्तेचा माज करत नाही'

बुधवारी मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुरुवातीला वाद झाला आणि नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल झाला आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप सेनेच्या कार्यकर्त्यांवर आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाष्य केले आहे. 'होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचे नाही' असा इशाराच राऊतांनी भाजपला दिला आहे.

शिवसेनेकडून गुंडगिरी केली जात असल्याची टीका या गदारोळानंतर करण्यात येत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. तसेच शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचे नाही' अशा शब्दात राऊत भाजपला दम भरला आहे.

'शिवसेना गुंडगिरी करते, याला सत्तेचा माज करत नाही'
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'शिवसेना गुंडगिरी करते, मात्र याला सत्तेचा माज म्हणणे हे चुकीचे आहे. सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेने कुणी चाल करत असेल, तर होय आम्ही गुंड आहोत. गुंडगिरी म्हणत असाल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकलेला आहे, त्या वास्तूच्या दिशेने कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने केली यामुळेच मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे' असेही राऊत म्हणाले.बातम्या आणखी आहेत...