आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणे पकडली जात असतील तर याचा अर्थ अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यापासून अफगाणिस्तानात तयार होणारे अमली पदार्थ कुठे ना कुठे निर्यात होत आहेत. जमीन मार्गाने किंवा सागरी मार्गाने निर्यात करता येते. आणि सागरी मार्गाने जे अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रकरणे पकडण्याचा आमचा प्रयत्न असून त्यात आम्हाला मोठ्या प्रमाणावर यशही मिळत आहे. या शब्दांत, वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी सागरी मार्गाने अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे मान्य केले आहे.
आयएनएस विशाखापट्टणमवर नौदल दिनाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशातील सर्व एजन्सी नार्कोटिक्स ऑपरेशनवर एकत्र काम करतात. अमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात पकडली जात आहेत. याचा अर्थ आपल्या देशाची इंटेलिजंट यंत्रणा यशस्वी ठरत आहे. कारण अंमली पदार्थ देशात येण्यापूर्वीच पकडले जात आहेत. जेव्हा अशा ऑपरेशन्स होतात तेव्हा तटरक्षक दल २०० नॉटिकल मैलच्या आत कारवाई करते आणि त्यापेक्षा जास्त अंतराच्या प्रकरणांमध्ये नौदल कारवाई करते. अशी माहिती त्यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत दिली. स्वदेशी बनावटीचे स्टेल्थ डिस्ट्रॉयर आयएनएस मोरमुगाओ ‘गोवा मुक्ती दिना’च्या एक दिवस आधी १८ डिसेंबर रोजी नौदलाच्या ताफ्यात दाखल केले जाईल. सध्या भारतीय नौदलाची ४५ जहाजे पब्लिक सेक्टर आणि खाजगी शिपयार्डमध्ये बांधली जात असल्याचे ते म्हणाले.
वेस्टर्न नेव्हल कमांडला १०० महिला अग्निवीर मिळणार २० नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत ३४७४ अग्निवीर सामील झाले आहेत. यामध्ये ३४० महिला अग्निवीरांचा समावेश आहे. सध्या त्यांची वैद्यकीय प्रक्रिया सुरू आहे. आम्हाला आशा आहे की मेडिकलमध्ये एकूण उत्तीर्ण होणारे महिला अग्निवीर त्यापैकी सुमारे ५० टक्के वेस्टर्न नेव्हल कमांडला मिळतील, अशीही माहिती त्यांनी या वेळी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.