आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई:मुलांच्या कपड्यांत लपवलेले 1.5 कोटींचे ड्रग्स जप्त; चरस आणि गांजासह एकाला अटक, रेव्ह पार्टीत खपवण्याची होती तयारी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टील फ्लास्कमध्ये लपवेलले 1.5 कोटींचे ड्रग्स जप्त - Divya Marathi
स्टील फ्लास्कमध्ये लपवेलले 1.5 कोटींचे ड्रग्स जप्त
  • मुंबईत DRI आणि NCB च्या कारवाईत कोट्यवधींचे ड्रग्स जप्त

मुंबईत नववर्षाच्या उत्सवापूर्वीच दोन वेगवेगळ्या कारवाईत अमली पदार्थ जप्त केले. पहिली कारवाई महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने केली. मुलांच्या कपड्यांत ठेवलेले 1.5 कोटी रुपयांचे ड्रग्स ताब्यात घेतले. तर दुसऱ्या कारवाईत NCB ने 4 किलो गांजा आणि हशीश (अमली पदार्थ)सह एका व्यक्तीला अटक केली आहे. पकडलेले ड्रग्स मुंबईत होणाऱ्या रेव्ह पार्टींमध्ये वापरण्यात येणार होते.

दक्षिण आफ्रिकेतून आले होते 1.5 कोटींचे ड्रग्स

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाकडून सांगण्यात आले की, मुलांचे कपडे कथितरित्या दक्षिण आफ्रिकेतून विक्रोळीत आले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, DRIच्या मुंबईस्थित झोनल युनिटने दोन स्टीलच्या फ्लास्कमधून 497 ग्रॅम मादक पदार्थ जप्त केले आहेत. याची किंमत 1.5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील महिला स्मिथ या शहरातून विक्रोळीत येणाऱ्या एका पार्सलमधून या ड्रग्सची तस्करी करणार असल्याची माहिती संचालनालयाला मिळाली होती.

हे ड्रग्स मुलांच्या कपड्यांमध्ये लपवले होते
हे ड्रग्स मुलांच्या कपड्यांमध्ये लपवले होते

एका अधिकाऱ्याने सांगितले की, अंधेरी येथील आंतरराष्ट्रीय कुरिअर हब येथे हे ड्रग्स सापडले. तपासणी दरम्यान हे पदार्थ स्टीलच्या फ्लास्कच्या आतील आणि बाहेरील भिंती दरम्यान लपवलेले आढळले. हे ड्रग्स हस्तगत करण्यात आला असून एनडीपीएसच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका रेव्ह पार्टीत 4 किलो चरसचा वापर करण्यात येणार होता
एका रेव्ह पार्टीत 4 किलो चरसचा वापर करण्यात येणार होता

रेव्ह पार्टीचे आयोजन करणाऱ्याला 11 किलो गांजासह पकडले

दुसर्‍या प्रकरणात, रेव्ह पार्टीची तयारी करत असलेल्या आयोजकाला ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरातील मुलुंड चेक नाकाजवळ नार्कोटिक्स ब्युरोने अटक केली आहे. अशरफ मुस्तफा शाह असे आरोपीचे नाव आहे. अशरफकडे 4 किलो चरस आणि 11 किलो गांजा सापडला. शाहने आयोजित केलेल्या पार्टीत सामील होण्यासाठी अनेक तरुणांनी प्री-बुकिंग केले होते.

बातम्या आणखी आहेत...