आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील यांची सूचना:स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठांनी अभ्यासक्रमसाठी प्रस्ताव द्यावेत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी काळाच्या गरजेनुसार अभियांत्रिकी, कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या समावेशासह विषयांची मांडणी करून, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमक्रम सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार करणे महत्त्वाचे असून, संबंधित अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदीत सुधारणा करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदी बदलाबाबत, अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संघटनेच्या समस्यांबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना काळानंतर वैद्यकीय क्षेत्र अधिक विस्तारण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्येनुसार वैद्यकीय यंत्रणा असणे गरजेचे असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या नवीन शिक्षणक्रमासह नवीन शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव संघटनेने सादर करावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...