आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद पेटला:राणांच्या एमआरआयवरून सेनेने "लीलावती’ ला घेतले फैलावर, स्पाँडिलायटिस असतानाही उशी कशी वापरली, सेनेचा सवाल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमान चालिसा पठणच्या वादावरून चर्चेत आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार झाले होते. मात्र उपचाराचे फोटो बाहेर आल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनीषा कायंदे आणि अन्य शिवसेना नेत्यांनी सोमवारी (१० मे) लीलावती रुग्णालय प्रशासनाला फैलावर घेतले. एमआरआय स्कॅनची मागणी केली. तसेच रुग्णालयाची पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले.

खासदार नवनीत राणा यांचा एमआरआय स्कॅन होत असतानाचा फोटो बाहेर आला होता. त्यावर आक्षेप घेत धातूचे उपकरण एमआरआय स्कॅन कक्षात कसे काय नेले, तिथे फोटो काढायची परवानगी कशी काय दिली गेली, असे प्रश्न शिवसेना नेत्यांनी उपस्थित केले. तसेच नवनीत राणा यांचा एमआरआय स्कॅन रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा पवित्रा शिवसेना नेत्यांनी घेतला.

राणा यांचा खरोखर एमआरआय झाला आहे का, झाला असेल तर एमआरआय करताना फोटो कसा काय काढला गेला, रुग्णालयाचे नियम सर्वांना समान नाहीत का, सेलिब्रिटींना वेगळा न्याय आहे का, असे सवाल शिवसेना नेत्यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाला केले.

नवनीत राणा यांनी उपचाराचे फक्त नाटक केले असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ‘स्पाँडिलायटिस असतानाही उशी वापरणे, एमआरआय रूममध्ये कॅमेऱ्याचा वापर करणे या सर्व गोष्टींवरून हे फक्त उपचाराचे नाटक होते,’ असा आरोप पेडणेकर यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांवर टीका केली की वाय सुरक्षा मिळते, अशी टीका उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी साताऱ्यामध्ये बोलताना केली.

खार येथील घराला पालिकेने बजावली पुन्हा नोटीस
नवनीत राणा सोमवारी दिल्लीला तक्रार करण्यासाठी गेल्या होत्या. इकडे बृहन्मुंबई महापालिकेचे अनधिकृत बांधकाम विभागाचे पथक त्यांच्या खार येथील घरी गेले. पथकाने सुमारे तासभर घराची पाहणी केली आणि नोटीसही बजावली. यापूर्वी दोन नोटिसा राणा यांना बजावण्यात आल्या आहेत. शिवसेनेची बृहन्मुंबई पालिकेवर गेली २८ वर्षे सत्ता आहे.

बातम्या आणखी आहेत...