आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:सेना, साहेब, हिंदुत्व, गद्दार, आमचा बाप, तुमचा बाप, हेच ऐकवायला दोन्ही गटांनी जमवले अडीच लाख लोक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिंदे यांच्‍या सभेला जमलेला जनसमुदाय - Divya Marathi
शिंदे यांच्‍या सभेला जमलेला जनसमुदाय

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठा दसरा मेळावा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची ताकद सिद्ध केली. एकूण दीड तासाच्या भाषणात पहिला तासभर शिंदे यांनी सर्व जुने मुद्दे उगाळले. पण शिवतीर्थावर उद्धव यांच्या भाषणातील टीका समोर आल्यावर अखेरच्या अर्ध्या तासात एकनाथ शिंदेंना सूर सापडला. त्यांनी हिंदुत्व, आनंद दिघे, महाविकास आघाडी, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा यावरून उद्धव यांच्यावर कठोर हल्ला केला. गद्दार म्हणून हिणवले जात असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक मोठ्या प्रमाणावर आपल्यासोबतही असल्याचे दाखवून दिले.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावरील उद्धवांची पकड सैल

@शिवाजी पार्क - 60 हजार ,शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला जास्तकरून मुंबईचे शिवसैनिक हजर होते.
@शिवाजी पार्क - 60 हजार ,शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला जास्तकरून मुंबईचे शिवसैनिक हजर होते.

शिवतीर्थ मैदान भरेल की नाही, अशी शंका अनाठायी असल्याचे उद्धव यांच्या सभेतून लक्षात आले. मात्र, दोन वर्षांच्या तुलनेत यंदा २० हजारांनी गर्दी घटली. त्यातही मुंबईकरांची अपेक्षित उपस्थिती नव्हती. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मुंबईवरील उद्धव यांची पकड सैल झाल्याचे दिसले.

बाळासाहेबांनी जे अखेरचे भाषण केले त्या खुर्चीसमोर शिंदे नतमस्तक.
बाळासाहेबांनी जे अखेरचे भाषण केले त्या खुर्चीसमोर शिंदे नतमस्तक.

यांच्या न बोलण्याने आश्चर्य- मेळाव्यात आदित्य ठाकरेंचे भाषण नाही

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्य पिंजून काढणारे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भाषण न झाल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. घराणेशाहीवरून शिवसेना फुटली असतानाही व्यासपीठावरील बॅनरवर मात्र बाळासाहेब, उद्धव यांच्या बरोबरीने आदित्य ठाकरे यांचेच फोटो झळकत होते.

बातम्या आणखी आहेत...