आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षा राऊत उद्या ईडी चौकशीसाठी हजर राहणार:सूडबुद्धीने कारवाई सुरू; सुनील राऊत यांचा दावा

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीने संजय राऊत यांना अटक केली, आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही समन्स पाठवले आहे. त्यामुळे वर्षा राऊत या उद्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली.

आम्ही शिवसेना मजबूत करू, परत शिवसेनेचे राज्य येईल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. राऊत आज माध्यमांशी मुंबईत बोलत होते.

उद्धव सीएम होतील

सुनील राऊत म्हणाले, आम्ही शिवसेना मजबूत करू, परत राज्यात शिवसेना मजबूत होईल आणि पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. सूडबुद्धीने आमच्यावर कारवाई केली जात आहे. गत चार पाच महिन्यांपासून हेच सुरू आहे.

भ्रष्टाचार कुठे झाला?

सुनील राऊत म्हणाले, अलिबागची जी जमीन ईडीने ताब्यात घेतली त्यात काहीच नाही. जेव्हा आम्ही जमीन घेतली. तेव्हा रेडिरेकनर दर जो होता त्या तुलनेत राऊत यांनी राज्यसभेसाठी जो अर्ज केला त्यात नमूद माहिती एक कोटी सहा लाख रुपये तर मला सांगा की, कुठे भ्रष्टाचार झाला.

चौकशीसाठी जाणार

सुनील राऊत म्हणाले, राऊतांच्या भोंग्यामुळेच एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री झाले आहेत. आम्ही घाबरणारे नाही. वर्षा राऊत यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत त्या उद्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत.

वर्षा यांना समन्स

एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चाैकशीसाठी समन्स पाठवले आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी वाढवण्यात आली. ईडीने 10 ऑगस्टपर्यंत त्यांच्या कोठडीची मागणी केली होती. सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) राऊत यांना 31 जुलैच्या मध्यरात्री अटक केली होती. गुरुवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यांची चौकशी सुरू झाली आहे.

हो त्रास झाला...

ईडी कोठडीत काही त्रास झाला आहे का, असे राऊतांना कोर्टाने विचारले असता राऊत म्हणाले की, मला जिथे ठेवले तिथे हवा खेळती नाही. मात्र, संजय राऊतांना आम्ही एसीमध्ये ठेवल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यावर राऊत यांनी मी तो पाहिला नसल्याचे सांगितले.

आर्थिक व्यवहारांची तपासणी

याप्रकरणी त्यांना 1 ऑगस्टला पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले पण त्यांना पुन्हा कोठडी मिळाली असून यादरम्यान ईडी आर्थिक व्यवहारांचे तपास करणार आहे.

कोर्टाने ईडीला फटकारले

याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. ईडी कोठडीत काही त्रास झाला आहे का असे राऊतांना कोर्टाने विचारले असता राऊत म्हणाले की, मला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले. त्या ठिकाणी योग्य व्हेंटिलेशन नाही असा आरोप राऊतांनी ईडीवर केला आहे. तर संजय राऊतांना आम्ही एसीमध्ये ठेवण्याचा दावा ईडीने केला आहे. यानंतर कोर्टाने ईडीला फटकार लगावली.

बातम्या आणखी आहेत...