आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे (जन्म: इ.स. १९२५) यांचे आज सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. पत्रकारितेतील लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला आहे.

दिनू रणदिवे यांचा जन्म डहाणूतील आदिवासीबहुल भागात १९२५ मध्ये झाला. त्यांनी १९५६ साली पत्रकारितेला सुरूवात केली. रणदिवे यांनी पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. ते १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने छेडलेल्या गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय होते. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला तसेच या लढ्यात त्यांनी डांगे, आचार्य अत्रे यांच्या बरोबर कारावासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालिक सुरू केले. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात येथूनच झाली होती. नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रणदिवे रूजू झाले व महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. १५ सप्टेंबर १९८५ रोजी ते मटातून निवृत्त झाले, तोपर्यंत त्यांनी वार्तांकनात महत्त्वाचे मापदंड घालून दिले. 

१९७२ मध्ये रणदिवेंनी केलेले बांग्लादेश मुक्तिलढ्याचे वार्तांकनही गाजले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका व लोकमित्र या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे. ते सेबिस्टियन डिसोझा मुंबई मिररमध्ये फोटो एडिटर होते. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यावेळी त्यांनी धाडसाने छायाचित्रण करून पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते, जो या प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा ठरला. त्यापूर्वी त्यांनी फ्रेंच वृत्तसंस्था एएफपीसाठीही काम केले होते. २००२ मधील गुजरात दंगलीचे वास्तवसुद्धा त्यांनी माध्यमांमध्ये आणले होते.

बातम्या आणखी आहेत...