आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीची पिडा:राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल, सीजे हाऊस प्रकरणाची केली चौकशी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आज वरळी येथील सीजे हाऊस येथील फ्लॅट खरेदी प्रकरणात सही करण्यासाठी आले होते.

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे सध्या ईडीची पिडा सुरू आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रकरण ताजे असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले असल्याची माहिती आहे. सीजे हाऊस प्रकरणात ही चौकशी होत आहे.

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आज वरळी येथील सीजे हाऊस येथील फ्लॅट खरेदी प्रकरणात सही करण्यासाठी आले होते. यापूर्वी ईडीकडून या प्रकरणाची दोन वेळा प्रफुल पटेल यांना समन्स बजावण्यात आला. यानंतर प्रफुल पटेल चौकशीसाठी देखील आले होते. सीजे हाऊस येथील एक फ्लॅट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार इकबाल मिर्ची याच्याकडून खरेदी केल्याचा आरोप प्रफुल पटेलांवर आहे. ईडीने यापूर्वी इकबाल मिर्चीची काही प्रॉपर्टी देखील सील केली होती. मनी लॉंड्रीग प्रकरणामध्ये आतापर्यंत ईडीने इकबाल मिर्ची याची बरीच प्रॉपर्टी सील केली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?
प्रफुल्ल पटेल यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्चीसोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार केला असल्याचा आरोप आहे. पटेल यांच्या कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमनसोबत आर्थिक व्यवहार करण्यात आला असल्याचे आरोपामध्ये सांगण्यात आले आहे. ईडीकडून सध्या याचा तपास करण्यात केला जात आहे. सीजे हाऊस ही वरळीमधील हायप्रोफाईल सोसायटी आहे. जी पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्सने विकसित केली असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...