आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज दु:खद निधन झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक अशी सुधीर जोशी यांची ओळख होती. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये सुधीर जोशी यांचा मोठा वाटा होता.

सुधीर जोशी यांची ओळख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे अतिशय जवळचे विश्वासू अशी होती. शिवसेना पक्ष संघटनेमध्ये सुधीर जोशींची महत्त्वाची भूमिका होती. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून सुधीर जोशी हे परिचित होते. यासोबतच ते शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते. पहिल्या युतीच्या सरकारमध्ये ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम काम पाहिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुधीर जोशी यांची प्रकृती खालवली होती. त्यांना कोरोनाची लागण देखील होऊन गेली होती. सुधीर जोशींवर मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनातून बरे होऊन ते नुकतेच घरी परतले होते. मात्र नंतर त्यांची प्रकृती पुन्हा अस्थिर झाली होती.

बातम्या आणखी आहेत...