आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झटक्यांची हॅट‌ट्रिक:सेन्सेक्स; 1457 अंकांनी पडला, वर्षात पाचवी मोठी घसरण

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार हा आठवड्याचा पहिलाच दिवस चौफेर घसरणीचा ठरला. शेअर बाजारात या वर्षातील पाचवी मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1,456.74 अंकांनी (2.68%) घसरून 52,846.70 वर बंद स्थिरावला. यापूर्वी 7 मार्च रोजी सेन्सेक्स 1491, 24 फेब्रुवारी रोजी 2702, 14 फेब्रुवारी रोजी 1747 आणि 24 जानेवारी रोजी 1546 अंकांनी घसरला होता. तर सोमवारी निफ्टीही 427.40 अंक (2.64%) घसष्न 15,774.40 वर बंद झाला. अमेरिकेत शुक्रवारी जारी केलेल्या महागाईच्या आकड्यांनंतर जगभरातील बाजारांत व्याजदर वाढण्याच्या भीतीने विक्रीचा दबाव निर्माण झाला. सर्वात जास्त फटका आयटी (3.92%) निर्देशांकाला बसला. रुपया सार्वकालिक नीचांकी पातळीवर 78.04 बंद झाला. बिटकॉइनसुद्धा सुमारे 19% घसरून 22,812.38 डॉलर वर आला आहे. डिसंेबर 20 नंतर प्रथमच 24 हजार डॉलरपेक्षा त्याचे मूल्य घटले आहे.

एक्‍सप्‍लेनर \ महागाई, युद्ध, क्रूड किमतीमुळे शेअर बाजार, रुपयावर दबाव
शेअर बाजार आणि रुपयाचे मूल्य घसरण्यामागे जागतिक घडामोडींसह महागाई हे प्रमुख कारण आहे.
-अमेरिकेतील महागाई: सध्या ४० वर्षांच्या उच्च स्तरावर आहे. ती नियंत्रित करण्यासाठी व्याजदर वाढू शकतात. अमेरिकेच्या १० वर्षांच्या बाँडचा यील्ड तीन वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर आहे.
-फेड व्याजदर वृद्धी : अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह बुधवारी दरवाढीची घोषणा करेल. सप्टेंबरपर्यंत दर १.७५% पर्यंत वाढू शकतात. त्यात दोन वेळा ०.५०% आणि एकदा ०.७५% वाढ शक्य आहे. गेल्या वेळी ०.७५%ची वाढ नोव्हेंबर १९९४ मध्ये केली होती.
-कच्च्या तेलाचे अस्थिर दर ब्रेंट क्रूड १.९६% नी घसरून १२०.०५ डॉलर प्रति बॅरल होते. चीनमध्ये कोरोना नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर तपासणीची घोषणा झाली. त्यानंतर क्रूडचे दर घसरले. पण अजूनही ३ महिन्यांच्या उच्च स्तरावर आहेत.
-एफपीआयची विक्री:
परकीय गुंतवणूकदार नऊ महिन्यांपासून भारतीय बाजारात विक्री करत आहेत. सोमवारी ४,८९०.७१ कोटी रुपयांचे शेअर विकले. जूनमध्ये १८,१५२ कोटी शेअरची विक्री केली आहे.

घसरणीचा शेवटचा टप्पा, खरेदीसाठी चांगला
^हा घसरणीचा शेवटचा टप्पा असू शकतो. कमी दरात चांगल्या शेअरची खरेदी करता येईल.- विनोद नायर, रिसर्च हेड,जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेस

बातम्या आणखी आहेत...