आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निच्चांक पातळी:चलनवाढीतील नरमाईमुळे दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स 142 अंकांनी वधारला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चलनवाढीतील नरमाईमुळे देशांतर्गत शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. बुधवारी सेन्सेक्स १४२ अंकांच्या वाढीसह ६२,६७८ वर बंद झाला. निफ्टीत ५२ अंकांची तेजी राहिली. ते १८,६६० वर बंद झाले. भारत, अमेरिका आणि युकेमध्ये महागाई दरात अपेक्षेपेक्षा जास्त कमी आल्याने आयटी समभागाच्या कामगिरीत झालेल्या खरेदीने बाजाराला समर्थन मिळाले. भारतात घाऊक महागाई दर नोव्हेंबरमध्ये २१ महिन्याच्या निच्चांक पातळी ५.८५% वर राहिली. दरम्यान, अमेरिकेतील किरकोळ चलनवाढीचा दर ऑक्टोबरमध्ये ७.७ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे, ब्रिटनमध्ये, महागाई ऑक्टोबरमधील ११.१% वरून नोव्हेंबरमध्ये १०.७% वर आली. तज्ञांच्या मते, अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिजर्व्हची दोन दिवसीय बैठकीची घोषणा बुधवारी उशीरा रात्री होणार होती. फेड आपल्या आक्रमक व्याजदर वाढीच्या भूमिकेसह सुरू ठेवेल अशी भीती कमी झाली.

बातम्या आणखी आहेत...