आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केल्याचा फटका गुरुवारी भारतासह जगभरातील शेअर बाजारांना बसला. बँक, आयटी, धातू, सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रासह वित्त सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्ससह मुंबई शेअर बाजार निर्देशाक सेन्सेक्सने ८७८.८८ अंकांनी गटांगळी खाल्ली. १.४० टक्के घसरणीसह सेन्सेक्स ६१,७९९.०३ अंकावर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीमध्ये २४५.४० अंकांची (१.३२ टक्के) घसरण होऊन तो १८,४१४.९० अंकांवर बंद झाला.
देशभरातील गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटींचे नुकसान सेन्सेक्समधील घसरणीमुळे देशभरातील गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्समधील गुंतवणूकीत मुंबईसह महाराष्ट्राचा १३ टक्के वाटा असून या हिशेबाने महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना ४० हजार कोटींचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसातील ही मोठी घसरण आहे.
धातू, बँक, वित्त सेवा निर्देशांकातही जबर घसरण अमेरिकेत आता व्याजदर ४.२५ वरुन ४.५० टक्के अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याज दरात अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे अर्धा टक्क वाढ केली. अमेरिकेत आता व्याजदर ४.२५ वरुन ४.५० टक्के झाले आहेत. ही वाढ बाजासाठी अनपेक्षित ठरली. तसेच पुढील वर्षातही व्याजदरवाढीचे संकेत दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.