आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेअर बाजार सोमवारी लागोपाठ चौथ्या दिवशी तेजीत बंद झाला. वाहन कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आल्याने सेन्सेक्स ५४५ अंकांनी (०.९५%) वधारत ५८,११५.५० वर बंद झाला. हा बेंचमार्क इंडेक्स या वर्षी १३ एप्रिलनंतर पहिल्यांदा ५८,००० वर बंद होण्यात यशस्वी ठरला. निफ्टीही १८२ अंकांच्या (१.०६%) तेजीसह १७,३४० वर पोहोचला. मागील चार दिवसांच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने २,८४७.०१ अंक किंवा ५.१५ टक्क्यांची आघाडी घेतली. तथापि, सोमवारी टाटा मोटर्सच्या शेअर्सनी सर्वाधिक ६.५८% उसळी घेतली. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्येही ६ टक्क्यांपेक्षा जास्त तेजी आली आणि अशोक लेलँड ३.५२% तेजीवर बंद झाला. दुसरीकडे २.६० टक्के घसरणीसह सन फार्मा कंपनी सेन्सेक्स-निफ्टीची टॉप लुझर राहिली. याशिवाय एचयुएल, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्येही ०.२८ ते १.६८ टक्के घसरण झाली. नियोजित फायनॅन्शिअर सर्व्हिसेसचे रिसर्च हेड विनोद नायर म्हणाले, अलिकडच्या काळात भारतीय बाजारात तेजीचे सर्वात मोठे कारण विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.