आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय बाजाराचा जगात सर्वाधिक वेग...:सेन्सेक्स 58 हजारांकडे, प्री-कोविडपेक्षाही 38% वर; सणासुदीआधी शेअर बाजारात आली तेजी

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे २३ मार्च २०२० ला सेन्सेक्स २५,९८१ आणि निफ्टी ७,६१० च्या खालच्या स्तरापर्यंत घसरला होता. नंतर बाजारात तेजी निर्माण झाली, ती अजूनही थांबलेली नाही. दोन्ही निर्देशांक नवी पातळी गाठत आहेत. २३ मार्च २०२० पासून आतापर्यंत सेन्सेक्स ३७,८७१ अंकांनी (१२२.७%) आणि निफ्टी ९,६२४ अंकांनी (१२६.५%) वाढला आहे. गुरुवारी सेन्सेक्स ५७,८५२ वर तर निफ्टी १७,२३४ च्या विक्रमी स्तरावर बंद झाला. जगाच्या कुठल्याही बाजारात एवढी वाढ दिसली नाही. भारतात गेल्या दीड वर्षात मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत लहान व मध्यम कंपन्यांच्या शेअर्सनी बाजी मारली. बीएसईचा स्मॉल कॅप इंडेक्स २०६.५%, मिडकॅप इंडेक्स १५०.१% नी वाढला आहे, तर लार्ज कॅप इंडेक्समध्ये १२६.६% वाढ पाहण्यास मिळाली आहे.

या तेजीची प्रमुख कारणे...
- लॉकडाऊनमध्ये १.४२ कोटी नवे गुंतवणूकदार जोडले. त्यांनी बचतीचा पैसा शेअर बाजारात लावणे सुरू केले. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांतच ४४.७ लाख किरकोळ गुंतवणूकदारांनी डीमॅट खाती उघडली. शेअर बाजाराच्या एकूण उलाढालीत आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा ३९% होता, आता तो ४५% आहे.

- विदेशी गुंतवणूकदार कायम आहेत. एफपीआयने गेल्या वर्षी २.७४ लाख कोटी रु. गुंतवले होते. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत फक्त १,१७२ कोटी रु. काढले आहेत. देशातील गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षी १.३४ लाख कोटी रु. काढले होते. चालू आर्थिक वर्षात ४४,५८१.८० कोटींची गुंतवणूक केली.

एक्स्पर्ट व्ह्यू : सामान्य लोकांनी तेजीत अडकू नये, कंपन्यांचे भविष्य पाहावे केआर चोकसी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे एमडी देवेन आर. चोकसी म्हणाले, जास्त किंमत देऊन कमकुवत कंपन्यांचे शेअर खरेदी करणे टाळावे. ज्यांचे फंडामेंटल चांगले आहे, शेअर स्वस्त आहेत अशा कंपन्या निवडा. कंपन्यांचे भविष्य पाहणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...