आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:भाजपच्या 12 निलंबित आमदारांसाठी विधान भवनाबाहेर होणार मतदानासाठी स्वतंत्र व्यवस्था

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एका जागेच्या निवडणुकीसाठी येत्या ४ आॅक्टोबरला मतदान होणार असून या निवडणुकीत भाजपच्या निलंबित १२ आमदारांना मतदान करता येणार आहे. या आमदारांसाठी विधान भवनाबाहेर मतदानाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. राजीव सातव यांच्या निधनामुळे िरक्त झालेल्या एका जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील आणि भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणावर चर्चा सुरू असताना गोंधळ घातल्याने या आमदारांना निलंबित करण्यात आले होते.

निलंबित आमदार
आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, कीर्तिकुमार बागडिया.

बातम्या आणखी आहेत...