आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन बिग हंड्रेड:मालिका विजयाचे लक्ष्य : स्पेशल नवीन ट्रेनिंग प्लॅन; शतकासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचा खास फॉर्म्युला!

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चेतेश्वर पुजारा 28 आणि कर्णधार विराट कोहली 12 डावांपासून शतकाच्या प्रतीक्षेत
  • 4 अाॅगस्टपासून यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका

आतापर्यंतच्या अपयशाला दूर सारून इंग्लंड दाैऱ्यात मालिका विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. याच दर्जेदार कामगिरीसाठी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नेतृत्वात कोचिंग स्टाफने खास योजना आखली आहे. स्पेशल नवीन ट्रेनिंग प्लॅनच्या माध्यमातून आता मालिका विजयाचे लक्ष्य गाठण्याचा टीम इंडियाचा मानस आहे. फलंदाजांच्या शतकी खेळीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचा फाॅर्म्युला आहे. याच विशेष डावपेचातून भारत विजयी मोहीम फत्ते करण्यासाठी सज्ज आहे. पुढच्या महिन्यात कोहलीच्या नेतृत्वात संघ इंग्लंड दाैरा करणार आहे. या दाैऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ कसाेटी सामन्यांची मालिका ४ ऑगस्टपासून रंगणार आहे.

राेहित अद्याप विदेश दाैऱ्यात शतकी खेळीत अपयशी; शुभमानची नजर पहिल्या शतकावर
इंग्लंड दाैऱ्यामध्ये नवीन चेंडूंचा सामना करण्यासाठी संयमी खेळी करणे, हे सलामीवीर फलंदाजासाठी आव्हानात्मक ठरते. हीच जबाबदारी आता राेहित शर्मा आणि शुभमान गिल पेलणार आहेत. याशिवाय मयंक अग्रवाल आणि राहुल ही जाेडी बॅकअप ओपनरच्या भूमिकेत आहेत. राेहित शर्माला विदेश दाैऱ्यात कसोटी फाॅरमॅटमध्ये समाधानकारक खेळी करता अाली नाही. ताे दाैऱ्यात शतकी खेळीचा पल्ला गाठण्यासाठी उत्सुक आहे. युवा फलंदाज शुभमान हा आपल्या पहिल्या कसोटी शतकासाठी सज्ज झालेला आहे.

मधल्या फळीतील फलंदाज शतकासाठी उत्सुक; दर्जेदार खेळीसाठी प्रचंड मेहनत
भारतीय संघाचे मधल्या फळीतील तीन फलंदाज हे आता दाैऱ्यामध्ये शतकी खेळी करण्यासाठी उत्सुक आहेत. यामध्ये चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट काेहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा समावेश आहे. पुजाराने जानेवारी २०१९, काेहलीने नाेव्हेंबर २०१९ आणि रहाणेने डिसेंबर २०२० मध्ये आपले शेवटचे शतक साजरे केले हाेते. आता पुजारा २८ य काेहली १२ डावानंतर शतक झळकवण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी कौतुकास्पद ठरली हाेती. मात्र, त्याला यादरम्यान शतक साजरे करता अाले नाही.

बातम्या आणखी आहेत...