आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात कोरोना:महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 91 वर; औरंगाबादमध्ये सापडले आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, पुण्यात दोघांचा तर रत्नागिरीत एकाचा मृत्यू

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • पुण्यात 13 नवीन रुग्ण सापडले; पिंपरी-चिंचवडचे काही परिसर सील
  • 79 रुग्ण आजारमुक्त, मुंबईत बुधवारी आणखी 44 नवीन कोरोनाग्रस्त

महाराष्ट्रात संक्रमण थांबायचे नावच घेत नाहीये. बुधवारी राज्यात 71 नवीन प्रकरणे आढळले आहेत. यवतमाळमध्ये 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांचा दिल्ल्तील निजामुद्दीन मरकजशी संबंध असल्याची माहिती आहे. यात चार जण उत्तर प्रदेशचे दोन पश्चिम बंगालचे एक दिल्लीचा आणि एक स्थानिक व्यक्ती आहे. हे सर्वजण यवतमाळमध्ये कोणत्यातरी धार्माक कार्यक्रमासाठी आले होते. सध्या त्या सर्वांना यवतमाळ येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. तसेच, आज पुण्यात दोघांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे आज मृतांचा आकडा 10 वर गेला आहे. तिकडे रत्नागिरीतही एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. यासोबतच औरंगाबादमध्येही आणखी तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 17 झाली आहे. या तीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मुलाचा समावेश आहे तर दुसरी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीची पत्नी आहे. पण, तिसऱ्या रुग्णाचा या कोरोनाग्रस्तांशी काही संंध नाही. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण कुठुण झाली, हे अद्याप कळू शकलेले नाही. बारामतीत भाजीविक्रेत्याच्या मुलगा व सूनेपाठोपाठ दोन नातींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच आता राज्यात आतापर्यंत 1 हजार 80 रुग्णांची नोंद झाली आहे. तिकडे पुण्यात, आज एक महिलेसर तीन तीन जणांचा मृत्यू झाला. यापैकी दोघांना डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास होता. मुंबईमध्ये आता मास्क न घालता फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. यासोबतच राज्यात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी राज्यात 12 जणांचा मृत्यू झाला. यात मुंबईमध्ये 7 आणि पुण्यात तीन जणांचा बळी गेला. नागपूर आणि साताऱ्याही प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

स्वतः कार चालवत बैठकीला गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान 'मातोश्री' बाहेर एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत असलेल्या 150 पेक्षा जास्त सुरक्षा कर्मचाऱ्यांना क्वारेंटाइन करण्यात आले. आपल्या ड्रायव्हरला सुट्टी दिल्यामुळे मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः कार चालवत गेले. 

LIVE अपडेट्स

पुण्यात 12 तासांत 5 मृत्यू, 13 नवीन रुग्ण सापडले
पुण्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. नायडू हॉस्पिटलमध्ये 44 वर्षीय व्यक्तीचा तर ससून हॉस्पिटलमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आता मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे. तर गेल्या 12 तासांत 5 मृत्यूंची नोंद झाली आहे. पुण्यात बुधवारी 13 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून पिंपरी-चिंचवडमधील काही परिसर बुधवारपासून सील करण्यात आले आहेत.

अकोल्यात दुसरा पॉझिटिव्ह

कोरोना रुग्ण तपासणी बाबत नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे, हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. आता अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन झाली आहे.

बुलडाणात आणखी एक रुग्ण सापडला, एकूण 12 कोरोनाग्रस्त
बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 12 वर पोहोचली. बुलडाणात बुधवारी सापडलेला 25 वर्षीय रुग्ण चिखली येथील रहिवासी आहे. तो मरकजवरून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात होता असे सांगितले जात आहे. चिखलीत आता कोरोना बाधितांची संख्या 3 झाली आहे. रात्री उशिरा एकूण 12 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 11 जण निगेटिव्ह निघाले आहेत.

धारावीत आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण
मुंबईतील धारावी येथे आज आणखी दोन रूग्ण आढळून आले असून  यातील एका रूग्णाला आधीच क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. धनवाडा चाळ येथे नवीन रूग्ण आढळून आला आहे. यामुळे धारावीतील कोरोना बाधितांचा आकडा आता 9 वर पोहोचला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण
मंगळवारपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह नसलेल्या बीड जिल्ह्यात आता आष्टी तालुक्यातील पिंपळा कोयाळ येथे बुधवारी (दि.8) एक ६३ वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून त्या रुग्णावर सध्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तत्पूर्वी मंगळवारी एका दिवसात १५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. पैकी ११६ रुग्ण हे फक्त मुंबईतील आहेत. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा १०१८ वर गेला आहे. पुण्यात १८, नगर ३, बुलडाणा २, ठाणे २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी, सांगली प्रत्येकी १ अशा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी राज्यात १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६ मुंबई, ३ पुणे आणि नागपूर, सातारा, मीरा-भाईंदर येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली. राज्यात कोरोना बळींचा आकडा ६४ वर पोहोचला आहे. क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात १२ लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण झाले आहे.
२०,८७७ पैकी १९,२९० जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ७९ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात ३४,६९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४००८ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...