आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा पंधरवडा:राज्यामध्ये 17 सप्टेंबर ते दाेन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा, 10 सप्टेंबरपर्यंतच्या तक्रारींचा विचार केला जाणार

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर विशिष्ट कालमर्यादेत निपटारा करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधून या पंधरवड्यात नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे निर्देश दिले. पंधरवड्यातील अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना मंत्रालयापर्यंत येण्याची गरज भासू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच सुशासन नियमावली समितीची बैठक घेतली होती. शिवाय विभागीय पातळीवरील कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा आदींचा सहभाग

पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डीबीटी, नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेबपोर्टलवर १० सप्टेंबरपर्यंत प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, नगरविकास, आरोग्य, पाणीपुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश केला आहे. प्रलंबित प्रकरणांपैकी कितीचा निपटारा झाला आणि निपटारा न झालेल्या प्रकरणांविषयी ५ ऑक्टोबर रोजी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...