आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसेलच्या सिक्सरपेक्षा सुहानाचीच चर्चा:केकेआरला चिअर करण्यासाठी अनन्या आणि आर्यनसोबत पोहोचली शाहरुखची मुलगी, संपूर्ण सामन्यावर गाजवले वर्चस्व

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी, आयपीएल 2022 चा आठवा सामना पार पडला. हा समाना कोलकाता आणि पंजाब यांच्यात खेळण्यात आला. ज्यामध्ये केकेआरने शानदार प्रदर्शन केले आणि सामना 6 विकेटने जिंकला. या मॅचमध्ये बॉलिवूड अभिनेता आणि कोलकाता टीमचा मालक शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, त्याचा मुलगा आर्यन खान आपल्या टीमला प्रोत्साहन देताना यावेळी दिसले.

यावेळी सुहानाची मैत्रिण आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेही उपस्थित होती. या सामन्यात कोलकाताचे दोन खेळाडू उमेश यादव आणि आंद्रे रसेल यांनी अप्रतिम खेळ दाखवला. रसेलने 31 चेंडूत 70 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 8 षटकार आणि 2 चौके मारले. दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 225.80 होता.

रसेलने षटकार मारताच सुहाना, आर्यन आणि अनन्या आनंदात जल्लोष करताना दिसले. तसेच उमेश यादवने विकेट घेतल्यावर सर्वजण एका संघाप्रमाणे सेलिब्रेशन करायचे. कोलकाताचे सामने मुंबईत खेळले जात आहेत. यापूर्वी आर्यन आणि सुहाना यांनी कोलकाता संघाच्या वतीने आयपीएलच्या मेगा लिलावातही भाग घेतला आहे.

किंग खान IPL 2022 मध्ये दिसाला नाही
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आतापर्यंत कोलकाता सामन्यात संघाला पाठिंबा देताना दिसला नाही. प्रत्येक सिझनमध्ये शारूख खान आपल्या संघाला प्रोत्साहन देताना दिसतो. शारूख खान आपल्या नव्या येणाऱ्या पठाण या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्यनवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप
काही दिवसांपूर्वी खान कुटुंबाला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. शाहरुखचा मुलगा आर्यन खानवर ड्रग्ज सेवन आणि परदेशी ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात असल्याचा आरोप त्याच्यावर केला होता. आर्यनला एनसीबीने इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलवर कॉर्डेलिया या क्रूझ जहाजातून अटक केली. नंतर या प्रकरणात आर्यनविरुद्ध कोणताही ठोस पुरावा अद्यापही अजून सापडलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...