आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:संजय राऊत महाराष्ट्रातील सर्वात मोठा गुंड , शिवसेनेचे 55 आमदार कसे शरद पवारांच्या झोळीत टाकले? कळलेच नाही - शहाजीबापू ​​​​​​​

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुंडांची टोळी घेऊन अयोध्येला गेले.'' या संजय राऊत यांच्या विधानाचा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत जोरदार समाचार घेतला. ''संजय राऊत महाराष्ट्रातील सर्वात मोठे गुंड आणि चोर आहेत. शिवसेनेचे 55 आमदार कसे शरद पवारांच्या झोळीत टाकले? हे आम्हालाही कळले नाही.'' अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले होते राऊत?

संजय राऊत म्हणाले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुंडांची टोळी घेऊन अयोध्येला गेले. ते अयोध्यानगरीत शक्तीप्रदर्शन करायला गेले होते की प्रभू रामाच्या दर्शनाला गेले होते? या दौऱ्यात एकनाथ शिंदे गटाचे काही आमदार गेले नाहीत. शिंदे गटातील एक गट अस्वस्थ आहे.''

शहाजीबापूंचे जोरदार प्रत्युत्तर

संजय राऊतांच्या या विधानानंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, संजय राऊत हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गुंड आहे. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी 55 आमदारांना शरद पवारांच्या झोळीत टाकले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुंडांची टोळी घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले, या संजय राऊतांच्या टीकेबद्दल शहाजीबापू पाटील म्हणाले, ''महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा गुंड म्हणून संजय राऊतांचं नाव घ्यावे लागेल. कारण त्यांनी अडीच वर्षापूर्वी गुंडगिरी आणि मोठी चोरी केली.

आम्हाला चोर म्हणायचे कारण नाही

शहाजीबापू म्हणाले, शिवसेनेचे 55 आमदार कसे शरद पवारांच्या झोळीत टाकले? हे आम्हाला कळाले नाही म्हणून राऊत खरे गुंड आहेत. हा माणूस खरा चोर आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला चोर म्हणायचं काहीही कारण नाही. चोरी त्यांनीच केली होती. आधी भाजप-शिवसेनेची युती होती, त्यामुळे आम्हाला बहुमत मिळालं. पण रातोरात काळंबेरं करून सगळे बिघडून टाकले.