आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 दिवसांनंतर 18 मिनिटांसाठी भेटले शाहरुख-आर्यन:मुलाला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात पोहोचला शाहरुख, आज जामिनासाठी पुन्हा करणार प्रयत्न

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी ड्रग्स प्रकरणात याचिका फेटाळल्यानंतर तुरुंगात असणाऱ्या आर्यन खानला भेटण्यासाठी त्याचे वडील आणि अभिनेता शाहरुख खान मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता. पिता आणि पुत्राची जवळपास 18 मिनिटे भेट झाली.

शाहरुखसोबत त्याच्या स्टाफमधील काही लोकही आहेत. मात्र, फक्त शाहरुख खानने आर्यन खानची भेट घेतली. तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन आपल्या वडिलांना पाहून खूप रडला. 2 ऑक्टोबर रोजी अटक झाल्यानंतर प्रथमच आर्यनच्या कुटुंबातील एक सदस्य त्याला भेटायला आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका दाखल होणार आहे
सत्र न्यायालयाकडून आदेशाची प्रत मिळताच आर्यनच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळण्याविरोधात अपील दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण वेळ निघून गेल्यामुळे हे शक्य झाले नाही. आर्यनचे वकील आज सकाळी 10.30 वाजता पुन्हा जामीन अर्ज दाखल करणार आहेत. असे म्हटले जात आहे की, याचिका स्वीकारल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर असेल.

आर्यनच्या वकिलाकडे आता फक्त एक आठवडा शिल्लक आहे
NDPS कोर्टात आर्यनचा जामीन फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांकडे फक्त एक आठवडा शिल्लक आहे. या एका आठवड्यातच ते आर्यनला जामीन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. खरेतर 1 नोव्हेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. यानंतर, न्यायालय 14 नोव्हेंबरनंतरच उघडेल. अशा परिस्थितीत, आर्यनच्या बेलसाठी फक्त 7 वर्किंग डेस म्हणजेच एका आठवड्याचाच कालावधी आहे.

बातम्या आणखी आहेत...