आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारचा मोठा निर्णय:महिलांवर अत्याचार, आता फाशीची शिक्षा; आंध्रच्या धर्तीवर राज्यात ‘शक्ती कायदा’

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन महिन्यांचा तपास कालावधी आता 15 दिवसांवर आणला
  • अॅसिड हल्ला व विनयभंगातील पीडितेचे नाव उघड करण्यास बंदी

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक तयार करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पूर्वी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येत होती. नव्या कायद्यानुसार मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची तसेच महिला आणि मुलींना सोशल मीडियावरून त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

सन २०१८ मध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे १०.९५ टक्क्यांनी वाढले. अलीकडे राज्यात एकतर्फी प्रेमातून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या महिला अत्याचाराच्या क्रूर घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आंध्रच्या धर्तीवर नवा कायदा आणण्याचे वचन महाविकास आघाडी सरकारने दिले होते. शक्ती विधेयकावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर हे विधेयक तयार करण्यास मंजुरी देण्यात आली. शक्ती विधेयकाचा प्रस्ताव आता राज्याच्या अधिवेशनात मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

अत्याचारांना वेसण

> अॅसिड हल्ला व विनयभंगातील पीडितेचे नाव उघड करण्यास बंदी

> दोन महिन्यांचा तपास कालावधी आता १५ दिवसांवर आणला

> प्रयोगशाळांना अहवाल वेळेत देण्याचे बंधन

> शक्ती कायद्याचा मसुदा बनवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser