आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, राजकीय नेत्यांकडून पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज आपला 80 वाढदिवस साजरा करत आहेत. देशभरातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, असे म्हणत पंतप्रधाना मोदींनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पवारांना शुभेच्छा
'महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना.' असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

बाळासाहेब थोरातांकडून शुभेच्छा
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा. '

अजित पवारांनी दिल्या शुभेच्छा
हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला, आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो.

रोहित पवारांकडून शरद पवारांना शुभेच्छा

'महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय शरद पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा!'

उदयनराजे भोसलेंनी फोटो केला शेअर

आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांना 80 व्या जन्मदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser