आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी:दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांचा शिंदेंना महत्त्वाचा सल्ला, तर नरेश म्हस्केंचे जोरदार प्रत्युत्तर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. या लढाईच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्ला देऊ केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी सामोपचाराने गोष्टी होईल याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना शिंदेना दिला.

शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेवणाच्या तटावरून अटक केली. तेव्हा समजूतदारपणाचा सल्ला आपण का दिला नाहीत. तसेच तेव्हा मुखमंत्र्यांचा झालेला अपमान सहन झाला नसल्याने ती कारवाई झाली होती. तसेच सध्या जे युवराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनाला येईल तसा चुकीचा उल्लेख करत आहेत त्यांना पवार साहेब समजूतदारपणा दाखवण्याचा सल्ला पवार साहेब देणार का..? असा सवालही नरेश म्हस्के यांनी विचारला आहे.

दसरा मेळाव्यावरुन होत असलेल्या संघर्षावर अजित पवार यांनीही आज माध्यमांशी बोलताना भाष्य केले. जनता कुणाच्या मागे हे मेळाव्यानंतर कळेल, तर शिवसेना कुणाची हे निवडणुकीत स्पष्ट होईल. ज्याच्या हातात सत्ता असते, ते त्यांच्याच बाजूने निर्णय घेतात, अशी सध्या स्थिती आहे. दसरा मेळाव्यावरून वाद घालण्यात अर्थ नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारला कानपिचक्याही दिल्या.

मेळावा नेमका कोण घेणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आहे. मात्र, यावेळी शिवसेनेत फूट पडली असून एकनाथ शिंदे यांनी बंड करत आमचीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरेंच्याही शिवसेनेकडून अर्ज करण्यात आला आहे. त्यावरून एकनाथ शिंदे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार, असे बोलले जात आहे. मात्र, आता मुंबई पालिकेकडून दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनाच परवानगी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा शिवाजी पार्कवर हा मेळावा नेमका कोण घेणार, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...