आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार-मोदी भेट:राज्यात सध्या अराजकतासदृश परिस्थिती; डॅमेज कंट्रोलसाठी पवार मोदींना भेटले का? - प्रवीण दरेकर

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे. पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली आहे. पवार आणि मोदींच्या या भेटीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. डॅमेज कंट्रोलसाठी पवार मोदींना भेटले का? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली असावी. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी ही भेट घेतली असावी. महाराष्ट्रात सध्या अराजकतासदृश परिस्थिती आहे. काँग्रेसच्या आमदारांमध्येही नाराजी आहे. महाविकास आघाडी विस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याचे देखील दरेकर म्हणाले.

मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली असून, त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात पवार-मोदी भेट झाली असून, सुमारे 20 ते 25 मिनीटे ही भेट चालली आहे.

महाराष्ट्रात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. काल, मंगळवारीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार आणि मोदी यांच्यात दिल्लीत भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट नेमकी कोणत्या कारणाने झाली? कोणत्या मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

केंद्रीय मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी देखील काल रात्री शरद पवारांच्या दिल्ली येथील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले होते. त्या भेटीला काही तास उलटत नाहीत, तोच आता महाविकास आघाडीचे नेते पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

बातम्या आणखी आहेत...