आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजोबा नातू वाद:पद्मसिंहांच्या नातवाकडून पार्थ पवारांची पाठराखण, म्हणाले - मी लहानपणापासून पाहतोय, तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यातील राजकारणात पवार घराण्याचे विशेष महत्त्व आहे. याच कुटुंबातील वादामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझा नातू पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत बुधवारी फटकारले. यानंतर राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे.

विरोधीपक्षाकडून पार्थ पवारांना समर्थन देत या वादात तेल ओतण्याचं काम सुरू आहे. दरम्यान माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवारांचे समर्थन केले आहे. तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात, हे मी लहानपणापासून पाहत आलोय असे म्हणत मल्हार यांनी पार्थ यांची पाठराखण केली आहे.

मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत पार्थ पवारांना पाठिंबा दर्शवला. त्यांनी लिहिले की, 'तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात, हे मी लहानपणापासून पाहत आलोय. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत, आणि लढा कसा द्यायची हे आपल्याला माहित आहे' असे ते म्हणाले.

0