आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चलती का नाम तिसरी आघाडी!:शरद पवार-प्रशांत किशोर यांच्यात 3 तास खलबते; देशात बिगर भाजप पक्षांची मोट बांधण्यावर चर्चा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात आधीच राजकीय भेटीगाठी वाढल्या, तर्कवितर्कांना उधाण

देशात पुन्हा तिसऱ्या आघाडीचे गाणे वाजू लागले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी भेट घेतली. ‘सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी तब्बल ३ तास चाललेल्या या भेटीत बंगालमध्ये तृणमूलचा विजय, यूपी विधानसभा निवडणुका, कोरोनामुळे मोदींची खालावलेली प्रतिमा, यूपीए नेतृत्वाचा पेच व बिगर भाजप पक्षांची संभाव्य मोट यावर चर्चा झाल्याचा अंदाज आहे.

नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन मेळाव्यात पवार यांनी ‘महाविकास आघाडी लोकसभेला कायम राहील’ असे सूचक विधान केले होते. बंगालच्या निवडणुकीनंतर पवारांची सक्रियता पाहता ते देशात बिगर भाजप पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे. प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा त्याची चाचपणी असल्याचे मानले जाते.

गेल्या १२ दिवसांत ... काय चाललंय काय?
३१ मे : फडणवीस-पवार भेट
१ जून : फडणवीस-खडसे भेट
२ जून : खडसे-पवार भेट
८ जून : दिल्लीत उद्धव-मोदी भेट

  • भाजपची राज्यात नेत्यांची बैठक

१० जून : शरद पवारांचे सेनेसोबत निवडणुका लढवण्याचे संकेत ११ जून : प्रशांत किशोर-पवार भेट

  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे स्वबळावर निवडणुकांचे सूतोवाच
  • रामदास आठवले म्हणाले, अडीच-अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद आजही होऊ शकते. हे फडणवीसांना मान्य अाहे. उद्धव ठाकरेंनी विचार करावा.

शिवसेना - खासदार संजय राऊत यांनी ‘या भेटीकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही,’ असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ही भेट अ-राजकीय होती’ असा दावा केला आहे.
भाजप - प्रदेशाध्यक्ष आणि नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, पवार-प्रशांत भेटीवर मी बोलणे योग्य नाही.
काँग्रेस - प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, सर्व िनवडणुका स्वबळावर लढवू. अामची भूमिका अाम्हीच ठरवू.

प्रशांत किशोरच का?
प्रशांत यांनी गुजरातेत नरेंद्र मोदी, पंजाबात अमरिंदरसिंग, बिहारमध्ये नितीशकुमार, आंध्रात जगनमोहन, बंगालमध्ये ममता बॅनर्जी तर तामिळनाडूत द्रमुकच्या विजयात रणनीतिकार म्हणून मोलाचा वाटा उचलला. मात्र बंगालची निवडणूक आपल्यासाठी शेवटची असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

राज्यात आधीच राजकीय भेटीगाठी वाढल्या, तर्कवितर्कांना उधाण
1. काँग्रेसप्रणीत ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’च्या (यूपीए) नेतृत्वाची शरद पवार यांची मनीषा लपलेली नाही. सेनेकडून तसे वारंवार वक्तव्य झाले आहे.
2. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिगर भाजप पक्षांची मोट बांधण्याच्या चर्चा देशात आहेत. पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याकडून देशाचा ‘राजकीय मूड’ समजून घेतल्याची शक्यता आहे.
3. स्थापनेच्या २२ वर्षांनंतरही राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकलेला नाही. अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचे बळ वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी राज्यात ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.

बातम्या आणखी आहेत...