आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sharad Pawar Birthday Special : I Have Been Working In The State For 50 55 Years, So Far This Opportunity And Support Was Given To Me By The People Sharad Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांची प्रामाणिक कबुली:50-55 वर्षे राज्यात काम करतोय, ही संधी आणि साथ जनतेनी मला दिली म्हणून इथपर्यंत - शरद पवार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उत्साहात साजरा
  • व्हर्च्युअल माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री कार्यक्रमात सहभागी

मी आज 50-55 वर्षे राज्यात काम करतोय. ही संधी जनतेनी मला दिलीय, साथ दिलीय म्हणून इथपर्यंत आल्याची प्रामाणिक कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

जीवनाचे सुत्र स्वीकारले आहे त्या जीवनाच्या रस्त्यावर जाण्याचे प्रोत्साहन आपल्या मिळत असते. सार्वजनिक जीवनात काम करत असताना शेवटच्या माणसाच्या जपणुकीचे काम करता आले पाहिजे. त्यातून आपण शिकत असतो असे शरद बोलताना म्हणाले.

ज्यांच्यापासून आणि ज्यांच्या विचारापासून शिकलो त्याचे स्मरण करणे आवश्यक आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा निव्वळ उल्लेख करुन चालणार नाही तर त्यांच्या विचाराच्यादृष्टीने आपण गेले पाहिजे असे आवाहन शरद पवार यांनी तरुण पिढीला केले.

यावेळी शरद पवार यांनी महात्मा फुले यांचा मुंबईच्या गेटवे येथे पंचम जॉर्ज यांच्यासोबत घडलेली घटना सांगितली. पंचम जॉर्ज ज्यावेळी आले त्यावेळी पोलिस पगडी बांधलेल्या इसमाला बाजुला करत होते ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांना बाजुला करुन पंजम जॉर्ज यांनी महात्मा फुले यांची भेट घेतली. त्यावेळी फुले यांच्या हातात शेतकर्‍यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे मागणी पत्र होते. शेतकऱ्यांना संकरीत बियाणांचे वाण, कास्तकरी दुधाचा व्यवसाय करतो. त्यांच्याकडे असलेल्या समरक्ताच्या गायी त्यातून पुढे कमी दूध देणारी पिढी याची माहिती देताना शेतकर्‍यांना, कास्तकरी लोकांना संकरीत गायींचा पुरवठा करण्याची मागणी केली. त्यावर इंग्रज सरकारने विचारही केला होता. म्हणजे आधुनिक विज्ञानाचा विचार महात्मा फुले यांनी त्यावेळी केला होता तोच विचार पुढे शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. याची सविस्तर माहितीही शरद पवार यांनी दिली.

माझे एकाप्रकारचे भाग्य आहे की, स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये त्यावेळच्या गांधी-नेहरूंच्या विचारांची पताका घेऊन काम करण्याचे सूत्र माझ्या आईने स्वीकारले. ते काम करत असताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा कटाक्षाने पाळली पाहिजे, ही भूमिका देखील आयुष्यभर निभावली. याचा लाभ म्हणून आम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन लाभला असेही शरद पवार म्हणाले.

कोरोनाकाळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचे मी टाळत होतो. पण जयंतरावांनी एका ठिकाणी सर्व राज्यातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणायची संकल्पना मांडली, त्यामुळे मला नाही म्हणता आले नाही. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनात नवीन पिढी काम करताना दिसली याचा आनंद आहे. हीच नवीन पिढी पुढे राज्यात काम करेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

आज सामुहिक कष्ट केले. त्या कष्टाचा सन्मान करण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतल्याबद्दल अंत:करणापासून शरद पवार यांनी आभार मानले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser